TikTok वर आतापर्यंतचा सर्वात ‘खतरनाक’ व्हिडिओ, युजर्सही घाबरले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात लोकप्रिय असलेल्या टिकटॉक अ‍ॅपवर वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करुन प्रसिद्धी मिळविणे अनेकांचा छंद आहे. दरम्यान कोरोनापासून सुरक्षा म्हणून सध्या सर्वजण घरी आहे. काही लोक सोशल मीडियावर तर काही लोक ऑनलाइन गेम खेळून टाइमपास करताना दिसत आहेत. याशिवाय टिकटॉकवर सुद्धा लोक खूप सक्रिय झाले आहेत. सध्या अनेकजण टिक टॉक वर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. मात्र अशात एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली असून हा व्हिडीओ आतापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या घरी एकटाच टिक-टॉक व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. या युजरचे नाव रुबेन क्यूब आहे. रुबेनने त्याचा डान्स व्हिडीओ नुकताच टिक-टॉकवर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यावर जे सत्य समोर आले ते फारच धक्कादायक आहे. या युजरने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की मी घरी एकटाच आहे आणि मी माझा डान्स रेकॉर्डिंग केला आहे. त्याच्या मागे त्याच्या घरातील जिना दिसत आहे.

या जिन्यावर वरच्या बाजूला कोणाचे तरी दोन डोळे आणि सावलीसारखे काहीतरी दिसत आहे. काही वेळातच ही सावली आणि डोळे तिथून गायब होतात. हा व्हिडीओ समोर आल्यावर त्यावर अनेकांना कमेंट केल्या आहेत. काहींनी याला भूत म्हटले आहे तर काहींनी ती मांजर असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी मात्र हा तरुण घरी एकटा असल्याचे खोटं बोलत आहे असे नमूद केले आहे.. हा व्हिडीओ पाहिल्यावर रात्रभर मला सुद्धा झोप आली नव्हती असे त्याने म्हटले आहे. त्याच्याकडे कोणताही पाळीव प्राणी नाही आहे. याशिवाय तो कोणत्याही शहरात राहत नाही तर त्याचे घर एक कब्रस्तानाच्या जवळ आहे. त्यामुळे व्हिडिओत नेमके कोण आहे, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.