मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला भाऊ टोनी, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंगर नेहा कक्करची गाणी चाहत्यांना जेवढी आवडतात तेवढेच तिच्या डान्सचे व्हिडीओही त्यांना आवडतात. आताही युट्युबवर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

यात नेहा आपला भाऊ टोनी कक्करला त्याच्या हरकतीमुळे चप्पल दाखवताना दिसत आहे. टोनी व्हिडीओत एका मुलीसोबत डान्स करतो. तेव्हा नेहा चप्पल घेऊन त्याच्या दिशेने येताना दिसते. यानंतर टोनीही मजेदार अंदाजात कान पकडत माफी मागताना दिसत आहे.

टोनीचं हे गाणं नागिन जैसी कमर हिला अशा टायटलने आहे. हे गाणं एक मजेदार डान्सिंग नंबर आहे. यात व्हिडीओत सिंगर नेहा कक्करही डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत अनेक वेगवेगळे लोक डान्स करताना दिसत आहेत.

नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करही सिंगर आहे. कांताबाई हे त्याचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं होतं. हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. नेहा सध्या अनु कपूर, विशाल ददलानी यांच्यासोबत सिंगिंग शोचं जजिंग करताना दिसत आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like