Viral Video : पुण्यात सराईत गुन्हेगार ‘माधव’च्या अंत्ययात्रे दरम्यान 150 दुचाकींची रॅली, 200 ते 300 जण सहभागी झाल्याचा व्हिडीओ वेगाने प्रचंड व्हायरल, सर्वत्र खळबळ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बिबवेवाडी परिसरात 10 जणांच्या टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्यानंतर त्याच गुन्हेगाराच्या अंत्यविधी कोरोनाच्या भयावह परिस्थितीत ‘दीडशे दुचाकी’ आणि 200 जणांच्या रॅलीने झाला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. आता हे होत असलेले गुन्हेगाराचे उदात्तीकरण पाहून काही पोलिसच हे सगळं ‘हॉरीबल’ असल्याची प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक लॉकडाऊनमध्ये मध्यरात्री सराईत गुन्हेगार माधव वाघाटे (वय 27) याचा निर्घृण खून करण्यात आला. माधव वाघाटे हा एका गुन्हेगार तर होताच पण तो आता एका नामचीन गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता असे सांगितले जात आहे.

दरम्यान, त्याचा खून झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. पण इतर साथीदार पसार झाले आहेत. अद्याप तरी त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. तोपर्यंत आता माधव वाघाटे याच्या चाहत्यांनी अंत्ययात्रे दरम्यान मोठी दुचाकी रॅली काढली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हा अंत्यविधी पाहणाऱ्यांचे देखील हाल बेहाल झाले आहेत. तर पोलीस हैराण झाले आहेत. तर हे सगळं भयावह होत असल्याचे बोलू लागले आहेत. कारण, या अंत्यविधीचा एक व्हिडिओ Viral झाला आहे. त्यात जवळपास दीडशे दुचाकीवर सुमारे 200 ते 300 तरुण जात असल्याचे दिसत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारीचे पुढील काळातील चित्र सर्व काही सांगून जात असल्याचे जाणवते.

 

 

 

 

 

सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ वेगाने प्रचंड व्हायरल होत आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनमध्ये एखादे कार्य करायचे असल्यास त्यास परवानगी घ्यावी लागते, त्यासाठी खटाटोप करावा लागतो मग गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान दुचाकी रॅली कोणी काढली, त्यास कोणी पाठबळ दिले हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.

गुन्हे शाखा अन् स्थानिक पोलीस करतात तरी काय?

कुविख्यात गुन्हेगार गजा मारणे याने तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पार 200 ते 300 चारचाकी कार घेऊन जंगी रॅली काढली आणि एकप्रकारे त्याने रॉयल इंट्री मारत पुणेकरांना मी आल्याचे दाखवून दिले. पण, तो जेलमधून सुटणार आहे ही माहिती गुन्हे शाखा किंवा स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती का? अन् माहिती होती तर हे रोखता आले नसते का?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. भले पुन्हा त्याच्यावर कडक कारवाई झाली. पण सर्व झाल्यानंतरच पोलिसांना जाग येणार का?, असे आता पोलीस दलातील काही जाणकार अधिकारी बोलून दाखवत आहेत. (यात बहुतांश अधिकारी निवृत्त किंवा पुण्या बाहेर आहेत).

आता माधव वाघाटे याच्या खुनानंतर त्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. तर अनेकजण आले होते. मग स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा काय करत होती? आणि त्यांचे इंटिजलन्स नेमके आहे तरी कुठे? एकीकडे तडीपार गुंड शहरात फिरतात आणि गुन्हे करतात. काही दिवसांपूर्वी तडीपार गुंडाने पोलिसाचाच चाकुने सपासप वार करून खून केला होता. या दरम्यान तो गुंड काही महिन्यांपासून पुण्यात येत असल्याचे आता खासगीत पोलीस सांगत आहेत. मग ही जबाबदारी कोणाची. या सर्व प्रकारामुळे मात्र पुणे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली जाऊ लागली आहेत.

 

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=315219500233647&id=100052367984364