Viral Video : सराईताच्या अंत्यविधीला तब्बल 150 दुचाकीची रॅली, 200 जणांवर गु्न्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही एका सराईताच्या अंत्यविधीला तब्बल 150 दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 15) पुण्यात घडला आहे. याप्रकरणी 150 ते 200 जणांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अत्यंयात्रेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

माधव हनुमंत वाघाटे या सराईताचा खून झाला होता. त्यानंतर त्याच्या अंत्यविधीला 150 दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजळे यांनी फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके याच्यासह साथीदारांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

सहकारनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार होते. त्यामुळे 100 ते 150 जणांनी दुचाकीवरून बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोना नियमावलीचे आदेश झुगारून अंत्यविधीला 100 ते 150 जणांनी दुचाकी रॅली काढली होती. सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकींचे क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.