Coronavirus : ‘काोरोना’च्या बाधितांवर उपचार करताना PAK मधील डॉक्टरांचा ‘डान्स’, गंभीरने केला Video शेअर (व्हिडीओ)
पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त लोक बाधित झाले आहेत. महामारीने आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी जगभारतील सर्वच डॉक्टर प्रयत्न करत आहेत. रूग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी डॉक्टर विविध प्रयोग करत आहेत. असाच रूग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा पाकिस्तानच्या डॉक्टरांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खासदार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
Corona….जहां भी हो सुन लो 😂😂 चिट्टा चोला !! #nayapakistan pic.twitter.com/BVUznyxEW5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 12, 2020
व्हिडिओत पाकिस्तानमधील डॉक्टर कोरोना रूग्णांवर उपचार करताना डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत गंभीरने म्हटलेय की, ‘कोरोना तुम जहां भी हो सुन लो चिट्टा चोला’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे . पाकिस्तानी डॉक्टर डान्स आणि हासून रूग्णांमध्ये सकारात्मक विचार वाढवत आहेत. डॉक्टरांच्या या कृतीला गंभीरने शेअर केले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरस संक्रमण झालेल्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित रूग्ण आहेत. तर 85 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.या लढाईत गौतम गंभीर यांनी भारताला शक्य तितकी मदत केली आहे. दिल्ली सरकार आणि पीएम फंडात कोट्यवधी रूपयांची आर्थिक मदत केली आहे. गौतम गंभीर आपल्या पाकिस्तान विरोधातील वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात.