दारूबंदी असलेल्या ‘या’ ठिकाणी बारबालांसह तमंचेपे ‘डिस्को’, दारूच्या बाटल्या उडवत स्टेजवरच ‘अंदाधूंद’ फायरिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये दारू बंदी असूनही लोक कायदेशीर कारवाईला जुमानत नाहीत. बिहारमधील मधेपुरा येथे असेच एक उदाहरण समोर आले आहे जिथे सरस्वती देवीच्या पूजन कार्यक्रमात बारबालांनी जोरदार ठेका घेतला. तर काहींनी स्टेजवर जात बंदुका चालविल्या. दारूची बाटली हातात घेऊन तरुणांनीही मनसोक्त ठेका घेतला. या प्रकरणामुळे मधेपुरा येथे पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच कुठल्याही परवानगीशिवाय खुलेआम ऑर्केस्ट्राचे आयोजन करत त्यामध्ये दारू घेत लोक तमंचेपे डिस्को करताना दिसले.

ही घटना शंकरपूर पोलीस स्टेशन परिसरातील हरिराहा गावची आहे, जिथे सरस्वतीच्या पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांनी पहिल्यांदा ऑर्केस्ट्राचे आयोजन केले त्यांनतर मद्यधुंद होत मुलीनाबरोबर अश्लील नृत्य केले. तरुणांचे धाडस इथेच थांबले नाही. स्टेजवर उघडपणे बाटलीतील दारू उडविण्यात आली. स्टेजवर एक तरुण बेकायदेशीर गावठी पिस्तुलाने स्टेजवर गोळीबार करतानाही दिसला.

यासंदर्भात डीएसपी वासी अहमद म्हणाले की, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. फायरिंग करणाऱ्या युवकाचीही ओळख पटली आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिस छापा टाकत आहेत.