धक्कादायक ! हातगाडीवाल्यानं ‘नाल्या’च्या पाण्यात धुतल्या ‘प्लेट्स’, लोक म्हणाले – ‘भारतात कोरोना व्हायरसची एैशी-तैशी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर तुम्हाला स्ट्रीट फूड खाण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करेल. एका खाण्याच्या स्टॉल वर एक व्यक्ती घाणेरड्या ड्रेनेजच्या पाण्यातच छोले भटुरेच्या प्लेट्स साफ करताना व्हिडीओ मध्ये दिसत आहे. कोरोना व्हायरस शी जोडून या व्हिडिओला फेसबुकवर शेअर करण्यात आले आहे. हा आश्चर्यकारक व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की रस्त्याच्या कडेला छोले -भटूरे आणि पुलावचा हातगाडा आहे. त्याच वेळी, एक व्यक्ती ड्रेनेजच्या पाण्याने प्लेट धुवत आहे. ही तीच प्लेट आहे ज्यामध्ये छोले -भटूरे बनवून ग्राहकांना दिले जातात. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल तर कोरोना व्हायरसला घाबरू नका ‘भारतात कोरोना व्हायरसची ऐशी ,तैशी ‘ याबरोबरच हसणाऱ्या ईमोजी दाखवल्या आहेत.

जगजित सिंह नावाच्या फेसबुक वापरकर्त्याने सोमवारी हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला आतापर्यंत 95 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. तसेच, 4 हजाराहून अधिक शेअर्स आणि 500 हून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक ऍडवायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये लोकांना स्वच्छ राहण्याचे आणि घरातील भोजन खाण्यास सांगितले गेले आहे. आपण अद्यापही बाहेरचे अन्न खात असाल तर सावधगिरी बाळगा.

ऍडवायजरी मध्ये दिलेल्या सूचना

* स्वच्छ रहा.
* वारंवार हात धुवा
* घाणेरड्या हातांनी नाक, डोळे आणि तोंड खाजवू नका
* आजारी लोकांपासून अंतर ठेवा.
* आपण आजारी असल्यास, घरीच रहा.
* खोकला आणि शिंका येताना रुमाल किंवा टिश्यू वापरा आणि हात धुवा.
* एन -95 मास्क वापरा.
* जर तुम्हाला कोरोना विषाणूची लक्षणे दिसली तर मास्क लावा आणि जवळच्या रुग्णालयात तपासणी करा.