मानलेल्या 15 वर्षाच्या बहिणीवरच केला बलात्कार, नंतर मंदिरात जाऊन केले लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 15 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीला बहीण बनवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने सुरुवातीला मुलीला बहीण मानले होते आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला एवढेच नाही तर तिचा व्हिडीओ देखील काढला दहा महिने अत्याचार केल्यानंतर आरोपीने मुलीला घरा जवळील मंदिरात उभे करून तिच्याशी विवाह देखील केला. त्यावेळी मुलीने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत नातेवाईकांना सांगितले. मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

मुलाने मुलीचा व्हिडीओ बनवून दहा महिने तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अत्याचार केले. यासंदर्भात पोलिसांनी आरोपी सचिन मिश्रा आणि त्याची आई किरण मिश्रा यांना अटक केली आहे. सचिनच्या नावे या आधीही पोलिसांत अनेक तक्रारी दाखल आहेत आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

पोलीस निरीक्षक जितेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, आरोपी सचिन मिश्रा यांच्या घरी वडिलांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मुलीचे येणे जाणे होते. जिला सचिन मानलेली बहीण मानत असे. 26 डिसेंबर 2018 ला पहिल्यांदा सचिनने भाऊ बहिणीच्या नात्याचा उपयोग करून मुलीचा फायदा घेतला. त्यानंतर त्याने मुलीला मी सर्वांना सांगेल असे म्हणून ब्लॅकमेल केले आणि अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.

तीन ऑक्टोबरला आरोपीच्या आईने मुलीला साडी घालून जवळच्याच मंदिरात नेऊन दोघांचे लग्न लावून टाकले त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने शनिवारी आपल्या वडिलांना घडलेल्या सर्व घटना सांगितल्या त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी स्थनिक पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 376 (3 A), 376 (2 A), 376 (A), 506 (A), 508 (A), 120 B आणि पॉक्सो एक्टनुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपी सचिन आणि त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे.

 

Visit : Policenama.com