विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक : व्हिडीओ व्हायरल 

मुंबई : वृत्तसंस्था – एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका नामांकित विमा कंपनीचा माजी कर्मचारी योगेश शेळके या तरुणाचा हा व्हिडीओ असल्याचे समजत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून  व्हाईट कॉलर दरोड्याची पोलखोल या तरुणाने केली आहे. नडल्या शेतकऱ्यांना कसे लुटले जाते हे या तरुणाने उघड केले आहे.
तरुणाने खुलासा केला आहे की, कर्ज मागण्यासाठी बँकेच्या दारात आलेल्या शेतकऱ्यांच्या माथी पॉलिसी मारली जाते. त्याचे पैसे कर्जातून कपात केले जातात. जो त्याला विरोध करेल त्याला कर्ज नाकारलं जातं, असा गंभीर आरोप त्याने केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ गेल्या 3 दिवसांपासून व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडिओनंतर लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयात ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या व्हिडिओचा खुलासा करण्याची मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. दरम्यान, त्या नामांकित विमा कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करून चौकशीचे आदेश दिले आहेत अशीही माहिती समोर आली आहे. आपण व्हिडीओच्या माध्यमातून या तरुणाच्याच तोंडूनच ऐकूयात की, शेतकऱ्यांची फसवणूक नेमकी कशी केली जाते.