डान्स करताना युवकानं डान्सर सोबत केली ‘घाणेरडी’ गोष्ट, तिनं दिलं ‘तात्काळ’ उत्तर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या डिजिटल जगात कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. एखादी चांगली गोष्ट असो किंवा मग एखाद्याचं गैरवर्तन असो सोशलवरून ते काही लपून रहात नाही. असंच काहीसं झालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यात दिसत आहे की, एकानं गैरवर्तन करण्याची सीमा ओलांडली आहे. यानंतर रागाच्या भरात त्या लेडी डान्सर त्याच्या कानशीलात लगावते.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एक लेडी डान्सर डान्स करत आहे. एका माणूस अचानक स्टेजवर येतो आणि त्या लेडी डान्सरला जवळ ओढतो. तो तिच्या खूप जवळ जातो आणि गैरवर्तन करतो. यानंतर ती डान्सर त्याच्या कानशीलात लगावते. यानंतर ती स्टेजवरून निघणार एवढ्यात तिचा सहकारी तिला कंटिन्यू करायला सागंतो.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ युपीच्या कानपूरमधील कल्याणपूर ठाणा भागातील आहे. एका लग्न समारंभातील ही घटना आहे. यावेळी डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. याचवेळी डान्सरसोबत अशी घटना घडली. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

You might also like