‘क्या बात है’ ! माकडाकडून कपड्यांची ‘हटके’ धुलाई, कौतुकाचा वर्षाव (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या एका माकडाचा व्हिडीओ सोशलमिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माकड चक्क कपडे धुताना दिसून येत आहे. या माकडाच्या कपडे धुण्याच्या हटके शैलीवर नेटकरी खूप खुश झाले आहेत. या माकडावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हा व्हिडीओ नेटकरी फेसबुक, व्हॉटसअप इतर सोशलमिडीयावर शेअर करत आहेत. IFS अधिकारी सुशाता नंद यांना देखील हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आवरता आला नाही. या व्हिडीओत माकड पांढरे कपडे देशी स्टाइलने धुताना दिसत आहे. कपडे दगडावर आपटून झाल्यानंतर जवळच्या टबमध्ये असलेल्या पाण्यामध्ये माकड साफ करत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

माकडापासून शिका काही तरी

या माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली असून अनेकांनी या माकडाचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच अनेकांनी ‘या माकडाकडून काही तरी शिका’, असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्या माकडावर कौतुकांची थाप टाकली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like