मुंबईत भररस्त्यात पत्नीनं पतीला गर्लफ्रेन्डसोबत कारमध्ये ‘रंगेहाथ’ पकडलं अन् पुढ झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेने मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या पेडर रोडवर शनिवारी संध्याकाळी चांगलाच गोंधळ घातलेला दिसला. दुसऱ्या महिलेसोबत स्वतःच्या पतीला पाहिल्यानंतर या महिलेने रस्त्यावर गोंधळ करायला सुरुवात केली. भररस्त्यात सुरु झालेल्या या गोंधळामुळे वाहनांच्याही रांगा लागलेल्या दिसल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

एक तीस वर्षीय व्यक्ती एका महिलेसोबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास काळ्या रंगाच्या रेंज रोव्हर कारमधून जात होता. ते पेडर रोडवर पोहचल्यानंतर पांढऱ्या कारमधून त्यांचा पाठलाग करणारी त्या व्यक्तीची पत्नी त्याला गाडी थांबवायला सांगते. आणि त्याची पत्नी रेंज रोव्हरच्या समोर जाऊन उभी राहते आणि जोरजोरात गोंधळ करायला सुरुवात करते. गाडीत बसलेला पती दरवाजा उघडत नाही म्हणून खिडकीतून पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ती थेट गाडीच्या बोनटवर चढून कारच्या काचेवरती बूट मारायला सुरुवात करते. त्यावेळी कडेला उभे असलेल्या ट्रॅफिक पोलिसाचंही ही महिला ऐकत नाही. शेवटी तिचा पती कारच्या बाहेर येतो, मग ती त्याला लाथांनी मारहाण करते. नंतर दोघे पांढऱ्या कारमध्ये बसतात. पण थोड्याचवेळात त्याची पत्नी पुन्हा गाडीतून उतरुन पळत जात दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या महिलेला मारहाण करते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करुन त्या महिलेची सुटका केली.

दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर ट्रॅफिक पोलिसांनी दोन्ही गाड्या आणि त्या दाम्पत्याला गावदेवी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. मात्र, त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. तर, पोलिसांनी सदरील महिलेवरती रस्त्यावरती अडथळा निर्माण करुन ट्रॅफिक जॅम केल्याबद्दल चलन फाडण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like