Viral Video | हुबेहुब आपल्या वडिलांसारखी गोलंदाजी करतो मुरलीधरनचा मुलगा, व्हिडिओ झाला व्हायरल

नवी दिल्ली : Viral Video | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000पेक्षा जास्त विकेट घेणारा मुथैया मुरलीधरन निश्चितच सर्वश्रेष्ठ स्पीनर आहे. आता श्रीलंकेच्या या दिग्गज गोलंदाजाने निवृत्ती स्वीकरली असतील तरी त्याच्या मुलाला नुकतेच गोलंदाजी करताना अनेकांनी पाहिले. त्याची गोलंदाजीची अ‍ॅक्शन हुबेहुब आपल्या वडीलांप्रमाणे आहे. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

मुरलीधरनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या आणि आपल्या मुलाच्या गोलंदाजीची तुलना करणारा व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तो आणि त्याचा मुलगा दोघे नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. मुरलीधरनने या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, वडील आणि मुलाचा काळ. यासोबतच व्हिडिओसाठी त्याने आयपीएल फ्रेंचायजी टीम सनरायजर्स हैद्राबादचे आभार मानले आहेत.

मुरलीधरण सध्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद फ्रेंचायजीचा गोलंदाजीचा कोच आहे. तो अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन टीमचा भाग होता जिने 1996मध्ये आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | पुण्यात अवैधरित्या सावकारी करणार्‍या दिग्दर्शकास गुन्हे शाखेकडून अटक

Corona Vaccination | 18 वर्षांखालील देखील मुलांचं लसीकरण होणार; केंद्र सरकारची माहिती

T20 World Cup | भारत-PAK मध्ये होणार जोरदार टक्कर, UAE आहे तयार, दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Viral Video | muralitharan son does bowling action exactly like his father video went viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update