जेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’ शाहरुख आणि ‘भाईजान’ सलमान एकाच स्टेजवर भान हरपून थिरकतात ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन, किंग शाहरुख खान, भाईजान सलमान यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. यात हे तिघेही सुपरस्टार गाणं गाताना तुफान डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर हा व्हिडीओ 20 वर्षे जुना आहे. सहारा इंडिया परिवाराचे चेअरमन सुब्रत रॉय यांच्या इव्हेंटचा हा व्हिडीओ आहे. याचं नाव आहे सहारा भारत पर्व. सहारा भारत पर्व प्रत्येक वर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टर रोजी आयोजित केला जातो. हा जलसा एक आठवडा चालतो. हा व्हिडीओ साल 2000 मधील 26 जानेवारी रोजी झालेल्या इव्हेंटचा आहे. या दिवशी भारताच्या प्रजासत्ताक दिनाला 50 वर्षे म्हणजे गोल्डन जुबली पूर्ण झाल्याच्या आनंदात हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

हा व्हिडीओ त्या काळातील आहे जेव्हा तीनही सुपरस्टार्स आपल्या करिअरच्या अवघड काळातून पुढे आले होते. अमिताभ बच्चन सूर्यवंशम आणि कोहराम (1999) सारखे सिनेमे केल्यानंतर 2000 मध्ये त्यांचा मोहबत्तें सिनेमा आला होता. ही त्यांची ट्रांजिशन वाली फेज होती. 1999 मध्ये शाहरुखचा एकमेव सिनेमा बादशाह रिलीज झाला होता. शाहरुख जरी इव्हेंटमध्ये खुलून डान्स करत असला तरी याच्या बरोबर एक आठवडा आधी त्याचं प्रॉडक्शन हाऊस ड्रीम्स अनलिमिटेडचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. फिर भी दिल है हिंदुस्तानी हा सिनेमा सपशेल आपटला होता. शाहरुख आणि अणिताभ बच्चन पेक्षा शाहरुख चांगलं करत होता. 1999 मध्ये त्यानं बीवी नंबर वन, हम दिल दे चुके सनम आणि हम साथ साथ है असे सुपरहिट सिनेमे दिले होते. मार्च 2000 मध्ये रिलीज झालेला त्याचा सिनेम दुल्हन हम ले जाएंगे हा देखील खूप चालला.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like