भररस्त्यात कपडे फाडल्यानंतर विद्यार्थीनीनं ‘धो-धो’ धुतला, लाथा-बुक्क्यांनी चोपलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील एका रोडरोमियोला मुलीची छेड काढणे चांगलेच महागात पडले. या चिडलेल्या विद्यार्थिनीने या रोडरोमिओची रस्त्यातच लाथा बुक्क्यांनी मारहाण करत धुलाई केली. त्याचबरोबर रस्त्यावरील नागरिकांनी देखील त्याची धुलाई करत हात साफ करून घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सड़क पर कपड़े फाड़े तो छात्रा ने लात-घूंसों से धुना, वीड‍ियो वायरल
सड़क पर कपड़े फाड़े तो छात्रा ने लात-घूंसों से धुना, वीड‍ियो वायरल
सड़क पर कपड़े फाड़े तो छात्रा ने लात-घूंसों से धुना, वीड‍ियो वायरल
त्याला जबर मारहाण करण्यात आली असून त्याचे कपडे देखील फाडण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या रोडरोमिओला आपल्या ताब्यात घेतले. या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेविषयी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या विद्यार्थिनीला दररोज त्रास देत असे. या ठिकाणी हि पीडित मुलगी क्लासमध्ये येत असे.
सड़क पर कपड़े फाड़े तो छात्रा ने लात-घूंसों से धुना, वीड‍ियो वायरल
सड़क पर कपड़े फाड़े तो छात्रा ने लात-घूंसों से धुना, वीड‍ियो वायरल
मात्र हा रोडरोमिओ तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असे. सोमवारी त्याने सर्व हद्दी पार करत या विद्यार्थिनीवर जबरदस्ती करत तिचे कपडे देखील फाडले. यामुळे तिने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांना त्याला मोठ्या प्रमाणात चोप दिला. त्याचवेळी पीडित मुलीने देखील आरोपीला चांगलाच चोप दिला. तर काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला.
https://smedia2.intoday.in/aajtak/images/Photo_gallery/052019/live-pitai_6_082719082638.jpg
सड़क पर कपड़े फाड़े तो छात्रा ने लात-घूंसों से धुना, वीड‍ियो वायरल
दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव कबीर सांगितले जात आहे. या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात एक असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –