पिवळ्या साडीतील ‘त्या’ महिला निवडणूक अधिकार्‍याचा ‘जलवा’, सपना चौधरीच्या गाण्यावर ‘धमाकेदार’ डान्स (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोशल मीडिया सेंसेशन PWD ऑफिसर रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा टिक-टॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करतांना दिसते आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रीना एका समारोह मध्ये डान्स करतांना दिसते आहे. यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. रीनाचा डान्स व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केला गेला आहे. या व्हिडीओमध्ये ती हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे फेमस गाणे ‘तेरी आख्‍या का यो काजल’ या गाण्यावर डान्स करते आहे.

व्हिडीओमध्ये रीनाच्या व्यतिरिक्त आणखी एक महिला दिसते आहे. परंतु रीनाकडे सगळ्यांचे लक्ष जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या आधी रीना द्विवेदीचे टिक-टॉकवर अनेक डान्स व्हिडीओ पोस्ट झाले आहेत. या आधी देखील ती हरियाणवी गाण्यावर डान्स करतांना दिसून आली आहे. लोकसभा निवडणुकीचा वेळी पण ती पहिल्यांदा चर्चेत आली होती तेव्हा ती पिवळीसाडी घालून निवडणूकसाठी ती लखनौमध्ये मतदान केंद्रात पोहचली होती.

आरोग्यविषयक वृत्त –