काय सांगता ! होय, 2 प्रेमिकेंसह मंदिरात एकाच वेळी ‘लग्न’, दोघींच्या केसात भरलं ‘कूंकू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रयागराजमध्ये एक अनोखे विवाह प्रकरण समोर आले असून या युवकाने एका मुलीसह नव्हे तर दोन मुलींशी लग्न केले आहे. हा तरुण आपल्या नव्या प्रेमिकेसोबत लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचला. तेव्हा त्याची जुनी प्रेयसी देखील तिथे हजर झाली. आता अशावेळी एकच गोंधळ उडाला मग या तरुणाने चक्क दोन्ही प्रेयसींच्या डोक्यात सिंदूर भरून दोघींशीही लग्न उरकून टाकलं. अतिशय धक्कादायक अशी ही घटना प्रयागराजमधील कर्नलगंजमधील धाररिया परिसरातील आहे. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

नक्की काय आहे प्रकरण

वास्तविक या तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते आणि या प्रेमिकेने या तरुणाला लग्नासाठी धमकी दिली. जर त्याने लग्न केले नाही तर ती विष पिऊन आत्महत्या करेल. यावरूनच दोघांच्यात भांडण झाले. या मुलाने भांडणात तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मुलीने त्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक देखील केली होती.

असे म्हंटले जात आहे की , त्या युवकाला आपल्या भागातील एका मुलीवर आधीपासून प्रेम होते. त्यांची प्रेमकथा बर्‍याच वर्षांपासून चालू होती. पण चार दिवसांपूर्वी, जेव्हा त्याच्या पहिल्या मैत्रिणीने त्याला दुसर्‍या मुलीबरोबर पाहिले तेव्हा ती गोंधळ घालायला लागली.

सोमवारी हा तरुण जेव्हा आपल्या नव्या प्रेमिकेशी लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचला तेव्हा मात्र त्याची जुनी प्रेयसी देखील तेथे हजर झाली. त्यानंतर मात्र मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर घराजवळच्या एका मंदिरात सर्वांसमोरच त्या तरुणाने दोन्ही प्रेमिकांसोबत लग्न थाटलं. त्या दोघींच्या भांगेत सिंदूर भरला आणि त्यांना मंगळसूत्र देखील घातले.

या लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ सोशल साइटवर व्हायरल केला. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.