‘वारंटी’ला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ‘बेदम’ मारहाण, सोशल मिडीयावर व्हिडिओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर राज्यातील पोलीस गुन्हेगारांना पकडण्यात आणि त्यांचा एन्काउंटर करण्यात व्यस्त असताना उन्नावमधील पोलीस मात्र गुन्हेगारांचा मार खात आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश पोलिसांची मोठ्या प्रमाणात थट्टा करण्यात येत आहे.
वारंटी को पकड़ने गई पुल‍िस जमकर प‍िटी, सोशल मीड‍िया पर वीड‍ियो वायरल

वारंटी को पकड़ने गई पुल‍िस जमकर प‍िटी, सोशल मीड‍िया पर वीड‍ियो वायरल
या व्हिडिओमध्ये पोलीस एका वारंट बजावलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले असता तो पोलिसांनाच मारहाण करताना दिसून येत आहे. हा आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे. त्यानंतर मारहाण करून हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी देखील झाल्याचे यामध्ये दिसून येत आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे तीन पोलीस कर्मचारी असून देखील तो त्याला मारताना दिसून येत आहे. तसेच आपल्या साथीदारांना देखील मारहाण करण्यासाठी बोलवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
वारंटी को पकड़ने गई पुल‍िस जमकर प‍िटी, सोशल मीड‍िया पर वीड‍ियो वायरल

वारंटी को पकड़ने गई पुल‍िस जमकर प‍िटी, सोशल मीड‍िया पर वीड‍ियो वायरल
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या गावातील विविध नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये 40 ते 50 अज्ञात व्यक्तींविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच विविध तुकड्या बनवून या व्यक्तींना अटक करण्याचे काम देखील सुरु केले आहे. मात्र अद्याप फरार आरोपीचा शोध लागलेला नाही.
वारंटी को पकड़ने गई पुल‍िस जमकर प‍िटी, सोशल मीड‍िया पर वीड‍ियो वायरल

Visit : Policenama.com