Viral Video | ’तालिबान’ राजवटीत कॉमेडी करणे ’हराम’! गळा कापून कॉमेडियनची निर्घृण हत्या, व्हिडीओ वायरल

काबुल : Viral Video | अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर कब्जा मिळवण्यासह तालिबानने आपले कौर्य दाखवण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानने देशातील एक प्रसिद्ध कॉमेडियन नजर मोहम्मद (Nazar Mohammad) उर्फ खासा जवान (Khasha Zwan) यांची कंधार प्रांतात निर्घृणपणे हत्या (Viral Video) केली आहे.

आता दशहतवादी संघटनेने हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ वायरल केला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की कॉमेडियनला थप्पड मारली जात आहे. युद्धग्रस्त देशात लोकांच्या चेहर्‍यावर आनंद पसरवणार्‍या नजर मोहम्मद यांना तालिबानी दशहतवाद्यांनी त्यांच्या घरातून बाहेर खेचत आणले आणि क्रुरपणे ठार मारले.

 

 

तालिबानी दहशतवादी कंधार प्रांतात सरकारसाठी काम करणार्‍या लोकांना शोधणे आणि त्यांची
हत्या करण्यासाठी घरोघरी जाऊन शोध घेत आहेत. अफगाणिस्तानच्या मीडियाने सूत्रांच्या संदर्भाने
सांगितले की, नजर मोहम्मद यांना घरातून बाहेर काढून ठार मारण्यात आले.

त्यांची हत्या 23 जुलैला करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांनी या हत्येसाठी तालिबानला जबाबदार
ठरवले आहे. मात्र, कट्टरपंथी इस्लामी गटाने या घटनेत हात नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा कॉमेडियन पूर्वी कंधार पोलिसात नोकरी करत होता.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तालिबानी दहशतवादी, कॉमेडियन नजर मोहम्मद यांना कारमध्ये
बसवतात. कारमध्ये तालिबानी दहशतवादी शस्त्र घेऊन बसले आहेत आणि कॉमेडियनला थप्पड
मारत आहेत. याशिवाय, ते स्थानिक भाषेत नजर मोहम्मद यांना काही बोलताना सुद्धा दिसत आहेत.

स्थानिक मीडियाने म्हटले आहे की, घरातून बाहेर काढून त्यांना एका झाडला बांधण्यात आले. यानंतर त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली. यानंतर कॉमेडियनचा मृतदेह खाली टाकून ते निघून गेले.

हे देखील वाचा

PAN | तुमच्या PAN चं चौथं अन् पाचवं ‘अक्षर’ असतं खुपच ‘विशेष’, जाणून घ्या यावरून काय समजतं

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Viral Video | talibani terrorists killed a comedian nazar mohammad in afghanistan video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update