काय सांगता ! होय, बिबटयाला जेरीस आणलं छोटया बेडकानं (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – जगातील पक्षी-प्राणी आणि जनावरांचे एकपेक्षा एक सरस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रत्येकाला प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ पाहायला आवडतात. नेटकरी आशा व्हिडिओला जास्त पसंती दर्शवतात. असाच एक बिबट्या आणि बेडकाच्या युद्धाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकर्‍यांच्या पसंतीस आला आहे.

बिबट्याचा हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न प्रत्येक प्राणी आणि जनावर करतो. पण व्हायरल होणार्‍या या व्हिडिओमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. जंगलात बिबट्या आणि बेडकामध्ये लढाई झाली. बिबट्याने बेडकाची शिकार केली असेल असे सर्वांना वाटले. पण तसे काही झाले नाही. बेडकाने हिंमत्तीने बिबट्यासोबत दोन हात करत आपला जीव वाचवण्यात यश मिळवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ट्विट करताना त्यांनी ‘वेळ बदलत आहे. बेडूक आणि बिबट्यामधील अविश्वसनीय लढाई. पाहूयात कोण जिंकेल?’ 18 सेंकदाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका झाडाखली बेडूक बसला आहे. त्यावेळी बिबट्या तिथे जातो आणि पंजा मारायला सुरूवात करतो. त्यावेळी बेडूक तोंडातून फुसकारत प्रतिकार करतो तरीही बिबट्या मागे हटायला तयार होत नाही.