Viral Video | रस्ता ओलांडताना करू लागले छेडछाड, हत्तीने तरूणांला चिरडून मारून टाकले (व्हिडीओ)

नवी दिल्ली : Viral Video | हत्ती एक समजूतदार प्राणी म्हणून ओळखला जातो. परंतु डिवचल्यावर ते कधी-कधी अतिशय घातक ठरू शकता. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात संतापलेल्या हत्तीने एका तरूणाला ठार केले. हा जमाव हत्तींच्या कळपाला चिथावत होता आणि यावेळी एका नाराज हत्तीने तरूणाला आपल्या पायाखाली चिरडून मारले. (Viral Video)

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की हत्तींचा कळप रस्ता ओलांडत आहे. दरम्यान तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. काही लोक रस्ता ओलांडत असलेल्या हत्तींना अचानक चिथावू लागतात.

व्हिडिओत दिसत आहे की शांततेने रस्ता ओलांडत असलेल्या हत्तींची छेडछाड करत असलेले लोक ओरडत आहेत आणि गोंधळ घालून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कळपातील अनेक हत्ती गर्दीकडे दुर्लक्ष करत शांतपणे जात आहेत.

परंतु अचानक एका हत्तीला तरूणांकडून होणारी ही छेडछाड सहन होत नाही. हा हत्ती लोकांना
पळवू लागतो आणि तिथे एकच हलकल्लोळ उडतो. या दरम्यान एक तरूण रस्त्याच्या कडेल पडतो
आणि तो हत्तीच्या तावडीत सापडतो. हत्ती रस्त्याच्या कडेला पडलेल्या युवकावर हल्ला करून ठार मारतो.

हा व्हिडिओ आयएफएस ऑफिसर प्रवीण कसवान यांनी शेयर केला आहे. व्हिडिओ शेयर करून
त्यांनी लिहिले आहे की, एका तरूणाचा जीव गेला. मला आश्चर्य वाटते की कुणाला दोषी ठरवावे. हा
व्हिडिओ 25 जुलैचा आहे. ही घटना आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या एनएच-39 च्या जवळ घडली.

हे देखील वाचा

Coronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं

Anti Corruption | महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकार्‍यासह कोतवाल 1,00,000 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Viral Video | viral video assam elephant killed a man when crowd teases a herd of elephants

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update