पाणी पिण्यासाठी गेलेल्या हरिणावर मगरीनं केला हल्ला, पुढं झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)
पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगरातील विविध जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. जिवंत राहण्यासाठी प्राण्यांना रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. जंगली प्राण्यांच्या थक्क करणार्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
The chief function of the body is to carry the brain around & use its reflexes at the right time🙏 pic.twitter.com/v0KbCTuik4
— Susanta Nanda (@susantananda3) June 18, 2020
सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक हरिण पाठवण्यावर पाणी पिताना दिसत आहे. हरिण पाणी पित असतानाच पाण्यामधून मोठी मगर या हरिणाची शिकार करण्याच्या उद्देशाने बाहेर येते. मात्र हरिण चपळता दाखवत मगर बाहेर येते त्या क्षणी उडी मारुन आपला जीव वाचवते. सुशांत नंदा या आयएफएस अधिकार्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओला एक मजेदार कॅप्शन दिली आहे. आपल्या शरिराचे महत्वाचे काम असते मेंदू सोबत घेऊन फिरणे आणि मुख्य म्हणजे गरज असेल त्यावेळी हलचाल करुन चपळता दाखवत जीव वाचवणे, अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून 32 हजारहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करुन या हरिणाच्या चपळाईचे कौतुक केले आहे.