Viral Video : दारूच्या दुकानात घुसली तरूणी, फोडल्या 500 बाटल्या, वायरल होतोय व्हिडिओ

हर्टफोर्डशायर : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ वायरल होत असतात. यापैकी काही असे असतात जे पाहून लोक हैराण होतात. असाच एक व्हिडिओ ब्रिटनहून आला आहे. या व्हिडिओत एक तरूणी दारूच्या बाटल्या फोडताना दिसत आहे.

ही तरूणी ब्रिटनच्या (युके) हर्टफोर्डशायरची आहे. येथील एका सुपरमार्केट स्टोअरमध्ये जाऊन तरूणीने हे सर्व केले.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, तरूणी सुपरमार्केटमध्ये घुसली. तिथे ठेवलेल्या दारूच्या बाटल्या फोडू लागली. तिने सुमारे 500 बाटल्या फोडल्या. यानंतर घटनेचा व्हिडिओ वायरल होऊ लागला.

व्हिडिओमध्ये तरूणीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तीने हुडी परिधान केल्याचे दिसत आहे. तिच्या हरकती पाहून लोक सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

जेव्हा दुकानदार तरूणीला कंट्रोल करू शकला नाही, तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी येऊन तिला अटक केली. अटक केल्यानंतर ही तरूणी फुटलेल्या बाटल्यांवरून घसरताना दिसली आहे.

You might also like