‘Tik Tok’ वर व्हिडिओ काढणं पडलं ‘महागात’, पूराच्या ‘पाण्यात’ बडून तरुणाने गमावला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tik Tok वर व्हिडिओ बनवण्याचे व्यसन एका तरुणाला चांगलेच महागात पडले, व्हिडिओ बनवण्याच्या नादात या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. पूर आलेल्या पाण्यात स्टंट करताना व्हिडिओ शूट करताना एका तरुणाचा जीव गेला आहे. हा प्रकार तीन दिवसापूर्वीचा आहे. परंतू या तरुणाचा मृतदेह गुरुवारी मिळला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा गंभीर प्रकार बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील आहे.
Tik Tok वीड‍ियो बनाने के ल‍िए स्टंट, बाढ़ के पानी में डूब कर मौत
तीन मित्र कासिम, अफजल आणि सितारे हे तिघेजण अदलपूर गाव येथील रहिवासी आहेत, पूर पाहण्यासाठी हे मित्र केवटी येथील लाला चौर येथे पोहचले. त्यानंतर या पाण्यात धोकादायक स्टंट करत हे तरुण मोबाइलमधून फोटो काढत होते आणि Tik Tok वर विविध स्टंड करत व्हिडिओ शूट करत होते.
याच स्टंटच्या नादात अफजल या तरुणाचा मृत्यू झाला. ३ दिवसांनंतर NDRF ने याठिकाणी शोध घेतल्यावर त्यांना या तरुणाचा मृतदेह सापडला. यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
Tik Tok वीड‍ियो बनाने के ल‍िए स्टंट, बाढ़ के पानी में डूब कर मौत
स्लो मोशनमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कासिम रस्त्यावरुन पळत येतो आणि पूलावरुन वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उडी मारत आहेत. कासिम जसे की, पाण्यात उडी मारतो त्याला पोहताना अडचण यायला लागते. त्यामुळे काही सेकंदात कासिमला वाचवण्यासाठी अफजल पाण्यात उडी मारतो. परंतू कासिम वेगाने हात पाय मारत किनाऱ्याला आला पण अफजलला नशिबाने साथ दिली नाही. त्याचा पाण्यात श्वास न घेता आल्याने मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त –