विरंगुळा केंद्रासाठी महानगरपालिकेकडून यापुढेही मदत करणार : आमदार जगताप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आपला ज्येष्ठ नागरिक संघ हा संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ व्हावा व शहराच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरीकसंघ सतत कार्यरत रहावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी  केले. शहरातील बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून या पुढेही जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. या विरंगुळा केंद्राचा लाभ प्रभागातील जेष्ठ नागरिकांना होणार असल्याचेही म्हणाले.

गुरुवार दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.२६ विशालनगर, पिंपळे निलख  येथील सावित्रीबाई फुले उदयाना शेजारील ‍ विरंगुळा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8835707-ad0f-11e8-98a1-ed371192ef4c’]

​यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्या आरती चोंधे, नगरसदस्य संदीप कस्पटे, ज्येष्ठ नागरीक संघाचे सुधाकर वेदपाठक, अरुणभाऊ कस्पटे, सुर्यकांत मुथीयान, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, बाबासाहेब गलबले आदी उपस्थित होते.
ज्येष्ट नागरीकांना संबोधित करताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, या शहरातील बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून या पुढेही जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. या विरंगुळा केंद्राचा लाभ प्रभागातील  जेष्ठ नागरिकांना होणार आहे. सदरचे विरंगुळा केंद्र हे शहरातील महानगरपालिकेच्या उदयानातील पहिले विरंगुळा केंद्र असून विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी नगरसदस्या आरती सुरेश चोंधे यांनी गेल्या ५ वर्षापासून पाठपुरावा केला असल्याचेही ते म्हणाले.

विधी आयोगाची शिफारस : लोकसभेसोबत 13 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्या…!

यावेळी नगरसदस्य संदीप कस्पटे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले  विरंगुळा केंद्रास र.रु.२५ हजार मदत देत असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेमध्ये नगरसदस्या आरती चोंधे म्हणाल्या, या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरीकांचे विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी विरंगुळा केंद्रास २५ खुर्च्या व १ टेबल देण्यात येणार असल्याचे सांगितले केली.
सूत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.