Virar Hospital fire : महाराष्ट्रात कोव्हिड मृत्यू’तांडव’? टोपेंचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या विषाणूने अनेकांचा जीव घेतला असून, यामध्येच आता राज्यात अनेक रुग्णालयात प्राणवायू गळती होणे, अनेक सुविधा खंडित होणे, तसेच आग लागणे आशा अनेक कारणाने लोक हतबल झाले आहेत. मुबईतील विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात रात्री झालेल्या घटनेत १३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूतांडव सुरु आहे. असे म्हटले आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1385420780838604800

किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात कोव्हिड मृत्यूतांडव सुरु आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोव्हिड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे, असे देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विरारच्या घटनेची चौकशीची मागणी करत कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी म्हटले. तसेच विरारमधील कोव्हिड रुग्णालयामधील आयसीयूला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समल्याने खूप दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

काय आहे घटना ?
मुंबईतील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेलेली आग ही एसीचा स्फोट झाल्याने लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली आहे. रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती. रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये ४ महिला आणि ७ पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर काही वेळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.