धक्कादायक ! अष्टपैलू क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

विरार : पोलीसनामा ऑनलाईन – अष्टपैलू क्रिकेटपट्टूने आपल्या आईसह वीष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार विरारमधील नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीमध्ये उघडकिस आला आहे.

विनय प्रकाश चौगूले उर्फ दादू (वय २५) असे क्रिकेटपटूचं नाव आहे. तर सरस्वती प्रकाश चौगूले (वय ४२) असं त्याच्या आईचं नाव आहे.

विनय हा उत्तम क्रिकेटपटू होता. तो विरारच्या साईबा या क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळत होता. त्याने अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. दरम्यानत त्याचे वडील हयात नाहीत. तो आईसोबत राहात होता. एका ठिकाणी तो खासगी नोकरी करत होता. मात्र नेहमीच त्याला आर्थिक चणचण भासत होती. उधारीही होती.

दरम्यान दोघांनी काल विषारी औषध प्राशन करून राहत्या घरात आत्महत्या केली. दरम्यान काल रात्री आठच्या सुमारास त्यांचे मृतदेह घऱात सापडले. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.