विराट-अनुष्काच्या चॅटचा VIDEO VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विराट आणि अनुष्का यांच्या चॅटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दोघे व्हिडीओत संवाद साधताना दिसत आहे. सध्या तर विराट हा आयपीएलमध्ये व्यस्त आहे. अनुष्काही विराटची साथ देताना दिसत आहे. त्याला सपोर्ट करता यावा यासाठी अनुष्काने कोणता सिनेमाही साईन केलेला नाही.

View this post on Instagram

Happy friendship day 👫❤️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

सध्या या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. खरे म्हणजे ही एक जाहिरात आहे. ही जाहिरात विराट आणि अनुष्का या दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केली आहे. गुगल ड्युओची नवी जाहिरात आली आहे. या जाहिरातीमध्ये विराट आणि अनुष्का व्हिडीओ चॅट करताना दिसत आहेत. विराट एखाद्या शुटसाठी तयार होतो आणि थोडासा नर्व्हस दिसून येतो. त्यानंतर अनुष्का शर्मा त्याच्यासोबत एक प्रँक खेळते.

या व्हिडीओत दिसत आहे की विराटने सूटबूट घातला आहे. दुसरीकडे अनुष्का चेरी रंगाच्या ड्रेसमध्ये चिल मारताना दिसत आहे. अनुष्का घरातूनच त्याच्याशी बोलते असे दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 46 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

Loading...
You might also like