ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी विराटने केले ‘हे’ मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत ९ पॉईंट्ससह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यानंतर आठ-आठ पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहली याने या सामन्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याच्याशी संवाद साधताना विराट कोहली याने म्हटले कि, कोणताही सामना आम्ही हलक्यात घेणार नाही. वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेत तुम्हाला सातत्य राखणे गरजेचे असते, मात्र प्रत्येक सामन्यानंतर मिळणाऱ्या विश्रांतीमुळे आम्हाला यामध्ये मदत होत असल्याची कबुली यावेळी विराटने दिली. स्पर्धेतील प्रत्येक संघ तगडा आहे, त्यामुळे आम्ही कुणालाही दुबळे समजण्याची चूक करणार नाही. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांबरोबर खेळणार असल्याने प्रत्येकाला हि स्पर्धा जिंकण्याची समान संधी असल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले.

दरम्यान, अफगाणिस्तानचा संघ याआधीच स्पर्धेतून बाहेर पडला असल्याने त्यांना पराभवाने काहीही फरक पडणार नसला तरी विजय मिळवून दुसऱ्या संघांसाठी अडचण निर्माण करू शकतात.
आरोग्यविषयक वृत्त –

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी

You might also like