IND Vs SA – विराट कोहली ‘हे’ रेकॉर्ड करुन करणार सचिन, धोनी, गांगुलीची बरोबरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात तीन सामन्यातील सिरिजचा पहिला कसोटी सामना अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यातून विराट कोहली, सचिन तेंडूलकर आणि महेंद्र सिंह धोनीचे काही खास रेकॉर्डची बरोबरी करु शकतो. याशिवाय विराट गांगुलीच्या एका रेकॉर्डशी देखील बरोबरी करु शकतो. भारताकडून सर्वात जास्त कसोटी सामन्यात कर्णधार होण्याच्या रेकॉर्डमध्ये विराट गांगुलीची बरोबरी करेल. दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून तो धोनी आणि सचिन तेंडूलकरची बरोबरी करेल.

धोनी आणि सचिन तेंडुलकरच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात आठ आठ सामने खेळले आहेत. तर विराटने कर्णधार म्हणून दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात 7 सामने खेळले आहेत आणि आताचा हा 8 वा सामना असेल. धोनीच्या नेतृत्वात 8 सामन्यातील 3 सामने संघाने जिंकले तर 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागला. तर 2 सामने ड्रॉ झाले.

तर सचिनच्या नेतृत्वात 8 सामन्यापैकी 2 सामने भारताने जिंकले तर 5 सामन्यात पराभव झाला, 1 सामना ड्रॉ झाला. तर विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका संघाला 4 वेळा पराभूत केले, तर दोनदा भारतीय संघ पराभूत झाला, यात 1 सामना ड्रॉ झाला.

विराट करेल गांगुलीची बरोबरी
सौरभ गांगुलीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात भारताने 49 कसोटी सामने खेळले. तर विराटने 48 सामने खेळले. विशाखापट्टनमच्या कसोटीनंतर विराट कोहली गांगुलीची बरोबरी करेल. सर्वात जास्त कसोटी मध्ये कर्णधार राहिल्याचा रेकॉर्ड सध्या महेंद्र सिंह धोनीच्या नावे आहे, धोनीने भारतासाठी 60 कसोटी सामन्यात नेतृत्व केले.

आता यानंतर सर्वात यशस्वी कर्णधार विराटला मानन्यात येईल. त्याने आपल्या कर्णधार पदावर असल्यापासून भारताला 28 कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. धोनीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात भारताने 27 तर गांगुली कर्णधार असताना भारताने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवला.

Visit : policenama.com