अजिंक्य राहणे संदर्भात कोहलीचा मोठा ‘गौप्यस्फोट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्टइंडीज दौऱ्याआधी टीम इंडिया चा कर्णधार विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे विषयी मोठे वक्तव्य केले आहे. अजिंक्य रहाणे मागील काही काळापासून फॉर्ममध्ये नाही मात्र वेस्टइंडीज विरोधातील सिरीजमध्ये तो चांगली कामगिरी करेल असा विश्वास कोहलीने व्यक्त केला आहे.

विराट कोहलीने म्हटले की, ‘अजिंक्य आमचा महत्त्वपूर्ण खेळाडू असून त्याची गणना संघातील भरवशाच्या खेळाडूंमध्ये केली जाते. त्याला खेळाची उत्तम जाण असून दबावाच्या प्रसंगी त्याची कामगिरी आणखी सुधारते. आपण सर्वांनी पहिले आहे की, राहणे प्रत्येक सामन्यात प्रभावी क्षेत्ररक्षण करून संघासाठी मोठ्या प्रमाणावर धावा वाचवत असतो. स्लिपमध्ये तो सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करतो.’

कोहलीने पुढे म्हटले की, ‘कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्यची कामगिरी चांगली असून तो लवकरच फॉर्म मध्ये येईल. त्याला पुन्हा लयीत येण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी द्यायला हवी. श्रीलंकेच्या विरोधात रोहितची शानदार कामगिरी पाहून त्याला आम्ही राहणेच्या जागी दक्षिण आफ्रिकेत संधी दिल्याचे देखील त्याने स्पष्ट केले.’

रॉबिन सिंह यांची शास्त्री यांच्यावर टीकेची झोड :

दरम्यान, भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी आवेदन करणाऱ्या रॉबिन सिंह यांनी सद्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी म्हटले की अजिंक्य रहाणे आणि अंबति रायडू हे दोघेही वर्ल्ड कप टीम मध्ये जागा मिळविण्याचे हक्कदार होते मात्र त्यांना मोठी संधी डावलली जाऊन त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे. या दोनही खेळाडूंचा अनुभव आणि कोणत्याही परिस्थितीत खेळण्याचे कौशल्य लक्षात घेता त्यान्ना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय चुकीचा होता. माझ्या टीममध्ये मात्र हे दोघेही असते असे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त