विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली, दोघे झाले आई-बाबा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली ( Virat Kohli) यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि २०१७ साली दोघांनी इटलीत लग्न केले.

दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना कन्यारत्न झाली आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. “तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट”

काही दिवसांपूर्वी पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खाजगी फोटो क्लिक केले होते आणि हे पाहून अनुष्का भडकली होती. तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला होता. विराट आणि अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वॉलिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झाले होते. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला होता.