जानेवारी 2021 मध्ये ‘आई-बाबा’ बनणार ‘अनुष्का-विराट’, फॅन्सला दिली Good News

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहलीने ट्विटरद्वारे सांगितले आहे की जानेवारी 2021 मध्ये एक लहान पाहुणा त्यांच्या घरी येईल. विराटने पत्नी अनुष्का शर्मासोबत एक फोटो शेअर करत लिहिले, ‘आणि मग, आम्ही तीन होतो! 2021 जानेवारीत आगमन.’ विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये भाग घेण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आहे तर अनुष्का शर्मा मुंबईत आहे. विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले होते.

विराटने ही चांगली बातमी शेअर करताना जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये अनुष्का शर्माचा बेबी-बंप दिसून येत आहे. अनुष्का शर्मानेही विराटप्रमाणे ट्विट करुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केली.