‘रोहित आणि कॅप्टन विराट यांच्या पत्नींमध्ये ठीक आहे ना’, या प्रश्‍नावर रवी शास्त्रींनी केला ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. खेळाडूंच्या आपापसातील मतभेदांप्रमाणेच खेळाडूंमधील पत्नींमध्ये देखील वाद असल्याची चर्चा होती. मात्र या सगळ्या विषयांवर रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी सडेतोड उत्तरे दिली.

पत्रकार परिषदेत विराट कोहली यांच्याबरोबरच रवी शास्त्री देखील उपस्थित होते. यावेळी एका पत्रकाराने कर्णधार कोहली याला खेळाडूंच्या पत्नींमधील भांडणांविषयी प्रश्न विचारला असता रवी शास्त्री यांनीच याचे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना रवी शास्त्री म्हणाले कि, लवकरच भारतीय खेळाडूंच्या पत्नी देखील फलंदाजी आणि गोलंदाजी करताना तुम्हाला दिसून येणार आहेत, त्यावेळी तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा कराल ? त्याचवेळी सगळे जण खळखळून हसायला लागले. कर्णधार विराट कोहली याला देखील आपले हास्य आवरता आले नाही. विराट आणि रोहित यांच्यातील वादानंतर त्यांच्या पत्नींमध्ये देखील वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. स्टेडियममध्ये देखील सामना पाहत असताना कोहली आणि रोहितच्या पत्नीमध्ये असणाऱ्या वादांमुळे अंतर पाहायला मिळत होते.

दरम्यान, वर्ल्डकप सामन्यांमध्ये देखील दोघी एकसाथ मैदानात पाहायला मिळाल्या नव्हत्या. मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा याला संधी न दिल्याने रोहित आणि कोहलीमध्ये वाद झाले होते, असे सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर देखील दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले होते. त्याचबरोबर दोघांच्या पत्नींनी देखील एकमेकींना अनफॉलो केले होते. त्यामुळे विराटने जरी वाद नसल्याचे नाकारले असले तरी प्रत्यक्ष मैदानात दोघे एकमेकांशी कसे वागतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like