अनुष्काच्या कोहलीची ‘विराट’ लोकप्रियता, ‘किंग’ खान, ‘भाईजान’ सलमान सहित PM मोदींनाही टाकलंमागं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या बाबतीत रेकॉर्ड केलं आहे. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर तब्बल 50 मिलियन्स म्हणजे 5 कोटी फॉलोवर्स झाले आहेत. विराटनं नेहमीच आपल्या खेळीनं सर्वांना प्रभावित करत असतो. आपल्या स्टाईलमुळं तो स्टाईल आयकॉन बनला आहे. तरुणांमध्ये त्याची अफाट लोकप्रियता आहे. नुकताच त्यानं 50 मिलियन्सचा टप्पा गाठला आहे. खास बात अशी की, संपूर्ण भारतात 50 मिलियन्सचा टप्पा गाठणारा विराट एकमेव ठरला आहे.

विराटनं आपल्या लोकप्रियतेमुळे फॉलोवर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागे टाकलं आहे. मोदींच्या फॉलोवर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे इंस्टावर जवळपास 34 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. 50 मिलियन्सचा आकडा गाठणारा विराट एकमेव भारतीय ठरला आहे. त्यानं इसंटावर आतापर्यंत 930 पोस्ट टाकल्या आहेत. विराट लोकप्रियता विराट आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

इंस्टाग्रामवर जेवढेही व्हेरीफाईड अकाऊंट आहेत त्यांपैकी सेलिब्रिटींमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे तब्बल 20 कोटी म्हणजेच 200 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. इंडियन सेलिब्रिटींबाबत बोलायचं झालं तर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे तब्बल 49 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जी सेलिब्रिटी आहे ती आहे दीपिका पादुकोण. दीपिकाचे इंस्टावर 44 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.