Virat Kohli | विराट कोहली भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्तवेळा शून्यावर OUT होणार कर्णधार, Dhoni चा तोडला विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या विरूद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खुपच निराशा केली. विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या डावात काहीतरी खास करेल अशी आशा होती, परंतु असे काहीही झाले नाही. त्याला जेम्स अँडरसनने क्रीजवर स्थिर देखील होऊ दिले नाही आणि आपल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर तो आऊट झाला.

अँडरसनच्या चेंडूवर विराट कोहलीला जोस बटलरने विकेटच्या मागे झेलबाद केले आणि विराट गोल्डन डकचा बळी ठरून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटने शून्यावर आऊट होऊन टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीचा सुद्धा विक्रम मोडला.

सर्वात जास्तवेळा डकवर आऊट होणारा कर्णधार
भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त वेळा डक (शून्य) वर आऊट होणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनी होता. आता विराट कोहलीने त्याला मागे टाकले आहे आणि नंबर एकवर आला आहे. विराट कोहली इंग्लंडविरूद्ध पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात नवव्यांदा कर्णधार म्हणून आऊट झाला.

महेंद्र सिंह धोनीने 8 वेळा असे केले होते. तर याबाबतीत नवाब पतौडी तिसर्‍या नंबरवर आहेत जे कर्णधार म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये सातवेळा शून्यावर आऊट झाले होते. तर कपिल देवच्या बाबतीत असे 6 वेळा घडले होते.

टेस्ट क्रिकेटमध्ये सवार्र्त जास्तवेळा शून्यावर आऊट होणारे भारतीय कर्णधार :

9 – विराट कोहली
8 – MS Dhoni
7 – नवाब पतौडी
6 – कपिल देव

सर्वात जास्त वेळा गोल्डन डकवर आऊट होणारे कर्णधार

टेस्ट क्रिकेट- विराट कोहली (9 वेळा)
वनडे – सौरव गांगुली (9 वेळा)
टी20 – विराट कोहली (3 वेळा)

2021 मध्ये विराट कोहली चौथ्यांदा कर्णधार म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शून्यावर आऊट झाला. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले, जो आतापर्यंत तीनवेळा शून्यावर आऊट झाला आहे. 2011 मध्ये तो चारवेळा शून्यावर आऊट झाला होता तर 2017 मध्ये तो पाचवेळा शून्यावर आऊट झाला होता.

Web Title :- virat kohli became first indian captain who out on duck most times in test cricket and broke ms dhoni record india vs england

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 7,120 ‘कोरोना’मुक्त; 6,695 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Anil Deshmukh | सीबीआयला राज्य सरकार सहकार्य करत नाही, अधिकाऱ्याला सहाय्यक पोलिस आयुक्त धमकावतात

Maruti Suzuki च्या ‘या’ कारच्या प्रेमात पडला संपूर्ण देश, जोरदार होत आहे खरेदी – पहा तिची वैशिष्ट्य