इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोवर्स मिळवणारा पहिला क्रिकेटर ठरला विराट कोहली, ICC नं केलं अभिनंदन

नवी दिल्ली : भारताचा कॅप्टन विराट कोहलीची लोकप्रियता जगात वाढत चालली आहे. क्रिकेटच्या मैदानात त्याने अनेक विक्रम केले आहेत. परंतु आता सोशल मीडियावर सुद्धा किंग कोहली सातत्याने विक्रम करत आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोवर्स मिळवणारा जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे.

विराट कोहलीच्या या यशाबद्दल त्याचे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ने सुद्धा अभिनंदन केले आहे. विराट कोहली नेहमी इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या जिमचे व्हिडिओ तसेच अनेक शानदार व्हिडिओ आणि फोटो तो इंस्टाग्रामवर शेयर करत असतो.

 

 

 

 

आसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक छायाचित्र शेयर केले आहे ज्यामध्ये विराट कोहलीसह त्या सेलेब्सची छायाचित्रे सुद्धा आहेत ज्यांचे 100 मिलियन फॉलोवर्स आहेत. विराट कोहली इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोवर्स मिळवणारा जगातील पहिला क्रिकेटर आहे. विराट कोहलीसह या क्लबमध्ये जगातील निवडक मोठे सुपरस्टार आहेत.

100 मिलियन क्लबमध्ये कोहलीसह आणखी कोण?
विराट कोहलीशिवाय कुणीही क्रिकेटर इंस्टाग्रामवर 100 मिलियनच्या क्लबमध्ये सहभागी नाही. विराटसह द रॉक नावाने प्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉन्सन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार आणि लियोनेल मेसी या क्लबमध्ये सहभागी आहेत. याशिवाय सेलेब्ज बेयॉन्से आणि एरियाना ग्रँड या एलीट क्लबमध्ये आहेत.