विराट कोहलीनं ‘या’ बाबतीत ‘देसी गर्ल’ प्रियंकाला टाकलं मागे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीम इंडियाचा कॅप्टन आणि बॉलिवूड स्टार, प्रोड्युसर अनुष्का शर्माचा पती विराट कोहली यानं सोमवारी त्याच्या नावावर एक नवीन रेकॉर्ड केलं आहे. इंस्टावर सर्वात जास्त फॉलोवर्स असणाऱ्या भारतीयांच्या यादीत कोहली अव्वल स्थानावर आहे. इंस्टावर विराटच्या फॉलोवर्सची संख्या 70.1 मिलियन झाली आहे.

इंस्टावर 70 मिलियनचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय आहे. याशिवाय इंस्टावर सर्वात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या टॉप 10 भारतीय सेलिब्रिटींमध्ये तो एकमेव खेळाडू आहे.

विराटनंतर आता सर्वाधिक फॉलोवर्स भारतीयाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री प्रियंका चोपडा आहे. इंस्टावर तिचे 55.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.

जे खेळाडू लॉकडाऊनच्या काळात इंस्टा पोस्टवरून सर्वाधिक कमाई करतात त्या जगातील टॉप 10 खेळाडूंपैकी विराट एकमेकव क्रिकेटपटू आहे.

विराटचे फॉलोवर्स आता 7 कोटी 1 लाख 48 हजार इतके झाले आहेत. त्याच्या फॉलोविंग म्हणजे तो कुणाला फॉलो करतो या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर विराट 171 लोकांना फॉलो करतो. विराटच्या प्रत्येक पोस्टला लाखोंमध्ये लाईक्स आणि कमेंट्स असतात. त्याच्या पोस्टला चाहत्यांचा कायमच मोठा प्रतिसाद असतो.