विराट कोहली बनला इन्स्टाग्रामवर 75 मिलियनचा आकडा पार करणारा पहिला आशियाई ‘सेलिब्रिटी’ !

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आधुनिक काळातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. कोहलीच्या लोकप्रियतेला कोणतीच मर्यादा नाही. आपल्या खेळाबद्दलच्या आवडीमुळे ओळखल्या जाणार्‍या दिल्लीच्या क्रिकेटपटू कोहलीने फोटो शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्रामवर 75.5 मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे.

फेसबुकवर सुमारे 36.9 मिलियन लोक या क्रिकेटपटूला फॉलो करतात, तर 37.3 मिलियन लोक ट्विटरवर भारतीय कर्णधाराला फॉलो करतात. याचा अर्थ असा की, तीनही मोठ्या सोशल नेटवर्किंग साइट्स लक्षात घेतल्यास विराटच्या फॉलोअर्सची संख्या सुमारे 150 मिलियन आहे.

इन्स्टाग्रामवर 75.5 मिलियन फॉलोअर्सची संख्या अतुलनीय पोहोचत असल्यामुळे विराटने अ‍ॅपवर 75 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असणारा पहिला आशियाई सेलिब्रिटी म्हणून आपले नाव कोरले आहे. फलंदाज हा आशियातील एकमेव सेलिब्रिटी व्यक्ती आहे जो साइटवर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या लोकांमध्ये 40 क्रमांकावर आहे. नुकतेच त्याने प्रसिद्ध संगीतकार कार्डी बीला मागे टाकत 29 वे स्थान मिळविले आहे.

भारतीय कर्णधार हा इन्स्टाग्रामवर जगातील चौथ्या क्रमांकाचा अ‍ॅथलीट आहे. तो रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार जूनियरच्या मागे आहे. फोटो शेअरिंग साइटवर सर्वात फॉलो केला जाणारा सेलिब्रिटी पोर्तुगीज फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, ज्यांचे फॉलोअर्स आहेत 238 मिलियन आहे. संगीतकार आणि अभिनेत्री एरियाना ग्रान्डे 199 मिलियन फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर हॉलीवूडचा स्टार ड्वेन ‘द रॉक’ जॉनसन 194 मिलियनसह आहे.