IND Vs SA 2nd Test : कोहलीचं सातवं व्दिशतक, सर्व भारतीय कर्णधारांना मागे टाकून केला ‘विराट’ रेकॉर्ड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्यात सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने शानदार द्विशतक साजरे केले आहे. त्याने 295 चेंडूंमध्ये 28 चौकारांच्या साहाय्याने 200 धावा केल्या. कारकिर्दीतील सातवे द्विशतक त्याने साजरे केले. त्यामुळे आता त्याने सर्वाधिक द्विशतक साजऱ्या करण्याबाबत महेला जयवर्धने आणि वॉली हेमंड यांची बरोबरी केली.

त्याचबरोबर त्याने कसोटी कारकिर्दीत 7 हजार धावा देखील पूर्ण केल्या. त्याचबरोबर कोहलीने या शतकाबरोबरच सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा 6 द्विशतकांचा रेकॉर्ड देखील मोडला. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड देखील कोहली याने केला आहे.

नजर टाकुयात खालील रेकॉर्डवर

कसोटी सामन्यांत सर्वाधिक द्विशतक

१)डॉन ब्रॅडमन, 12 शतके,ऑस्ट्रेलिया
2) कुमार संगाकारा, 11 शतके, श्रीलंका
३) बायन लारा, 9 शतके ,वेस्टइंडीज
४) डब्ल्यू हेमंड, 7 शतके , इंग्लंड
५) विराट कोहली,7 शतके भारत

म्हणून सर्वाधिक दीडशतके
1) विराट कोहली, 9 शतके, भारत
2) डॉन ब्रॅडमन 8 शतके, ऑस्ट्रेलिया
3) बायन लारा,७ शतके, वेस्टइंडीज
4) महेला जयवर्धने, 7 शतके, श्रीलंका
5) ग्रॅमी स्मिथ,7 शतके, दक्षिण आफ्रिका
6) मायकल क्लार्क 7 शतके, ऑस्ट्रेलिया

कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके

1) ग्रॅमी स्मिथ, 25 शतके, दक्षिण आफ्रिका
2) रिकी पॉंटिंग, 19 शतके, ऑस्ट्रेलिया
3) विराट कोहली,19 शतके, भारत
4) एलन बॉर्डर, 15 शतके, ऑस्ट्रेलिया
5) स्टीव वॉ,15 शतके, ऑस्ट्रेलिया
6) स्टीव स्मिथ 15 शतके, ऑस्ट्रेलिया

दक्षिण अफ्रीकेविरुद्ध सर्वात कमी डावात 1000 धावा
1) 19 विराट कोहली 19 डाव, भारत
2) वीरेंद्र सहवाग 20 डाव, भारत
3) सचिन तेंदुलकर 29 डाव, भारत
4) 30 राहुल द्रविड 30 डाव , भारत

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा
1) वीरेंद्र सेहवाग 319 धावा चेन्नई
2) एम अग्रवाल, 215 धावा विझाग
3) विराट कोहली 254*, पुणे
4) रोहित शर्मा, 176 विझाग
5) सचिन तेंडुलकर 169, केप टाऊन

सर्वात कमी डावात २६ शतके
1) 69 डाव डॉन ब्रॅडमन
2) 121डाव स्टीव स्मिथ
3) 136 डाव सचिन तेंडुलकर
4) 138 डाव विराट कोहली
5) 144 डाव सुनील गावस्कर
6) 145 डाव मैथ्यू हेडन

visit : Policenama.com