विराट कोहलीच नंबर ‘वन’, ‘तोडलं’ 26 वर्षांपूर्वीचं पाकिस्तानच्या जावेद मियाँदादचं ‘हे’ ‘रेकॉर्ड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे. रविवारी पोर्ट ऑफ स्पेन येथे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात विराटने पाकिस्तानचा दिग्गज जावेद मियांदादचा विक्रम मोडला. आता विराट वेस्टइंडीज च्या विरोधात वन-डे मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. आजच्या सामन्यातील विराटच्या १९ व्या धावेबरोबरच त्याने हा रेकॉर्ड तोडून याबाबतीत तो अव्वल बनला.

दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस आली आणि मात्र भारताने पहिली विकेट लवकरच गमावली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटने वेगवान धावा जावेद मियांदादचा २६ वर्ष जुना विक्रमही मोडला. त्यामुळे विराट कोहली आता पाकिस्तानच्या जावेद मियांदादला मागे टाकत वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

मियांदादने वेस्ट इंडिजविरुद्ध ६४ डावांमध्ये १९३० धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल २६ वर्षे जगातील कोणत्याही खेळाडूने याहून अधिक धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. आता विराटने आपल्या अवघ्या ३५ व्या डावात ही कामगिरी केली आहे. विराटने सात शतकांच्या मदतीने ७१ च्या सरासरीने वेस्टइंडीज विरोधात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त