कोहलीनं घेतला अफलातून ‘कॅच’, फॅन्स पाहूनच झाले ‘हैराण’, ‘फिटनेस’मुळं बदलला खेळण्याचा ‘अंदाज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सर्व खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे. त्याचा फिटनेस हा जगभरातील इतर क्रिकेट खेळाडूंच्या तुलनेत कैक पटीने उत्तम असून तो अनेक खेळाडूंना आपल्या फिटनेसच्या जोरावर टक्कर देत असतो. फिल्डिंगच्या प्रत्येक विभागात तो आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना भुरळ पाडत असतो.

काल मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसरा टी-20 सामन्यात देखील कोहलीने त्याच्या शानदार फिल्डिंगच्या बळावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिकॉक याचा शानदार झेल टिपत सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे कोहलीने डिकॉकचा झेल सोडला असता तर त्याने पुढे आणखी शानदार खेळी करत भारताला विजयासाठी आणखी झगडायला लावले असते. कोहलीने पकडलेला हा झेल फार कठीण होता. मात्र कोहलीने त्याच्या फिटनेसच्या जोरावर हा झेल सोपा करून दाखवला. कोहलीने त्याच्या फिटनेसवर एका मुलाखतीत सविस्तरपणे माहिती दिली होती. यावेळी त्याने आपण फिटनेसवर का लक्ष दिले याची माहिती दिली होती.

दरम्यान, विराट कोहलीची टीम इंडिया सध्या टी-20 मालिका खेळणार असून त्यानंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. त्यामुळे भविष्यात देखील अशाचप्रकारे उत्तम खेळ करण्यासाठी या फिटनेसची गरज असल्याचे देखील विराट कोहली याने सांगितले.

Visit – policenama.com 

You might also like