…म्हणून ‘त्या’वेळी विराट कोहली रात्रभर ढसाढसा रडला !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील आघाडीची टी 20 लीग आयोजनदेखील लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सर्व क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद आहेत. विराटनेदेखील नुकताच या माध्यमातून संवाद साधून एक आठवणही सांगितली आहे.

सुरूवातीच्या काळात मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो, तेव्हा मला दिल्लीच्या (राज्याच्या) संघात निवडण्यात आले नव्हते. त्यावेळी मी पूर्णपणे हतबल झालो होतो. कोणतीच गोष्ट मनासारखी होत नव्हती. मी त्या रात्री पूर्णवेळ फक्त रडत होतो. माझ्या प्रशिक्षकांनादेखील विचारले की मला संघात का निवडले गेले नाही?, अशी आठवण विराटने ऑनलाइन व्हिडीओ चॅट दरम्यान सांगितली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कायम त्याच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत असतो.

त्याचा आक्रमकपणा खेळातून आणि विशेषत: मैदानावर क्षेत्ररक्षण करतानाही जाणवतो. ज्या चाहत्यांनी त्याची कारकीर्द अगदी सुरूवातीपासून पाहिली आहे. मैदानावर विराट कायम आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना दिसतो. कोहली त्याच्या आयुष्यात काही वेळा परिस्थितीपुढे हतबल झाला होता, त्याबाबत त्याने आठवण सांगितली. कोरोनामुळे संपूर्ण देश होरपळून निघत आहे, पण त्यात एक गोष्ट सकारात्मक झाली आहे की सारे नागरिक एकत्र येऊन याचा सामना करत आहे. या लढ्यात आपण करोनायोद्ध्यांना म्हणजेच पोलीस, डॉक्चर्स आणि नर्सेस यांच्या प्रती अधिक आदर व्यक्त करू लागलो आहोत, असे विराट म्हणाला.