World Cup 2019 : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूविषयी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघे सहा दिवस बाकी आहेत. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लंडनमध्ये पोहचला आहे . टीम इंडिया आणि टीम इंग्लंड वर्ल्डकप स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने इंग्लड संघातील ‘जोफ्रा आर्चर’ या नवख्या खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जोफ्रा आर्चर हा इंग्लंडच्या संघाचा मुख्य आधारस्तंभ असेल असे म्हणत त्याची स्तुती केली आहे.

जोफ्रा आर्चरविषयी बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘जोफ्रा आर्चर हा इंग्लंड संघाचा मुख्य आधारस्तंभ खेळाडू असेल. त्याच्याकडे असे कौशल्य आहे जे उर्वरित खेळाडूंपासून वेगळे आहे. तो वेगवान गोलंदाजी करू शकतो आणि तो एक चांगला खेळाडू आहे. मला खात्री आहे की इंग्लंडच्या संघाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याला वर्ल्‍ड कप स्पर्धेत खेळताना पाहणे औत्सुक्याचे असेल. ‘

इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मेपासून वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार होणार आहे . इंग्लंडच्या टीमने फक्त ३ वनडे आणि १ टी-२० मॅच खेळलेल्या जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी भारतात झालेल्या आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चरने चमकदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजमध्ये जन्मलेल्या जोफ्रा आर्चरने काही आठवड्यापूर्वीच इंग्लडकडून पदार्पण केलं आहे. जोफ्रा आर्चर हा या संघातील आश्चर्याची निवड ठरली. संभाव्य संघातही त्याला स्थान देण्यात आले नव्हते, परंतु त्याने पाकिस्तानविरुद्धच्या तीन वन डे सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली. डेव्हीड विलीच्या जागी त्याला संघात संधी मिळाली.