विराट कोहली ‘पिच’चं ‘परिक्षण’ करतानाचे फोटो ‘व्हायरल’, युजर्सनी बनवले ‘भन्नाट’ मिम्स

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत आणि श्रीलंकेमध्ये रविवारी 5 जानेवारीला टी20 सीरीजचा पहिला सामना खेळला जाणार होता. परंतु, पावसाचे पाणी खेळपट्टीवर पडल्याने हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात चेंडू न टाकताच पंचांनी सामना रद्द केला. परंतु, सोशल मीडियावर या सामन्या दरम्यानची छायाचित्रे व्हायरल झाली होती.

सोशल मीडिया यूजर्सने पुन्हा एकदा या छायाचित्रांचे मीम्स मोठ्याप्रमाणात व्हायरल केले आहेत. बीसीसीआयने रविवारी विराट कोहली खेळपट्टीचे परिक्षण करत असतानाचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले होते. या छायाचित्राचे मीम्स तयार करून दर्शकांनी मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहेत.

विराट कोहलीचे छायाचित्र बीसीसीआयने केले होते पोस्ट
सोशल मीडियावर यूजर्सने गुवाहटीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याचे मीम्स तयार केले आहेत. सामन्या दरम्यान खेळपट्टी सुखविण्यासाठी ग्राउंड स्टाफने हेयर ड्रायर आणि इस्त्रीचा वापर केला होता. यावेळच्या छायाचित्रांचे मीम्स तयार करून यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केले होते.

https://twitter.com/ImVisuu07/status/1213893929747152897

बीसीसीआयने जे विराट कोहलीचे छायाचित्र पोस्ट केले होते ते व्हायरल होत आहे. मागील 5 जानेवारीला बीसीसीआयने ट्विटरवर हे छायाचित्र शेअर केले होते आणि कॅपशनमध्ये म्हटले होते की, पुढील परिक्षण रात्री 9.30 वाजता होईल.

सोशल मीडियावरील मीम्समध्ये हे छायाचित्र प्रचंड व्हायरल होत आहे. विराट कोहलीचे छायाचित्र फोटोशॉप करून लोकांनी आणखी मनोरंजक केले आहे. कुणी रांगोळी काढताना त्यास दाखवले आहे तर कुणी त्याच्या हातात बांधकामाची थापी दिली आहे. या मीम्सपैकी एक मीम्स असेही आहे ज्यात विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा सुई धागाचा लुक दाखविण्यात आला आहे.

https://twitter.com/Aryann45_/status/1214152328636297218

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/