IND vs NZ : अंपायरशी ‘भिडला’ विराट कोहली, मैदानाच्या मधोमध झाला DRS वर मोठा ‘वाद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मैदानावर आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्डबरोबर चकमक झाली. ऑकलंडमध्ये खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान DRS वापरावरून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मोठा वाद झाला.

वास्तविक, न्यूझीलंडच्या डावा दरम्यान लेगस्पिनर युजवेंद्र चहल 17 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला आला. या ओव्हरचा पाचवा बॉल चहलने हेनरी निकोल्सला टाकला असता तो त्याच्या पॅडवर लागला. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हेनरी निकोल्सविरूद्ध एलबीडब्ल्यूचे आवाहन केले आणि मैदानातील अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्डनेही फलंदाजाला बाद केले. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. त्यांनतर वाद निर्माण झाला.

वास्तविक, अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्डला एलबीडब्ल्यू देण्यात आल्यानंतर न्यूझीलंडचा फलंदाज हेनरी निकोल्सने डीआरएस घेतला, परंतु पुनरावलोकनाची वेळ संपल्यानंतर. नियमांनुसार, खेळाडूंना डीआरएस वापरण्यासाठी 15 सेकंद दिले जातात, त्यांनतर कोणीही डीआरएस घेऊ शकत नाही. मात्र, निकोल्सने आपला साथीदार गप्टिलशी चर्चा केल्यानंतर डीआरएस घेण्याचे ठरविले, परंतु वेळ संपला होता. मात्र वेळ संपत असतानाही, मैदानावरील अंपायर ब्रुस ऑक्सनफजॉर्डने निकोल्सच्या पुनरावलोकनास मान्यता देऊन तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिला.

अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्डच्या निर्णयावर कर्णधार विराट कोहली नाराज होता आणि त्याच्याशी वाद घालताना दिसला. कोहली आणि ब्रुस ऑक्सनफोर्ड यांच्यात बराच काळ संभाषण सुरूच होते. दरम्यान, रिव्ह्यू घेतल्यानंतरही निकोल्सला बाहेर जावे लागले.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 273 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 274 धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने सर्वाधिक 79 धावा केल्या तर रॉस टेलरने 73 धावा केल्या. हेनरी निकोल्सने 41 धावांचे योगदान दिले. गुप्टिलने 79 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले तर टेलरने 74 चेंडूत सहा चौकार व दोन षटकार ठोकले. न्यूझीलंड संघाने अखेरच्या पाच षटकांत 53 धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने तीन, शार्दुल ठाकूरने दोन आणि रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.