टीम इंडियानं रचला ‘विराट’ इतिहास, जगातील कोणतीही टीम करू शकली नाही ‘ही’ कमाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेला 3-0 असे पराभूत केल्यानंतर कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारतीय संघाने आणखी एक पराक्रम केला आहे. जगातील कोणताच संघ करू न शकणारा पराक्रम भारताने केला आहे. घरच्या मैदानावर सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने या कसोटी विजयाबरोबरच केला आहे.

याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. त्यांनी दोन वेळा घरच्या मैदानावर सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडकडून 2012 मध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका हरलेली नाही. तेव्हापासून भारत केवळ जिंकतंच आलेला आहे.

घरच्या मैदानावर सर्वात जास्त मालिका विजय

१)भारत : सलग 11 मालिका विजय फेब्रुवारी 2013 पासून आतापर्यंत

२)ऑस्ट्रेलिया : सलग 10 मालिका विजय नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000

३)ऑस्ट्रेलिया : सलग 10 मालिका विजय जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008

४)वेस्टइंडीज : सलग 8 मालिका विजय मार्च 1976 ते फेब्रुवारी 1996

५)इंग्लंड : सलग 7 मालिका विजय मे 2009 से मे 2012

६)साउथ अफ्रीका :सलग 7 मालिका विजय मार्च 1998 ते नोव्हेंबर 2001

भारतीय संघाने यामध्ये सलग 11 कसोटी मालिका विजय मिळवताना 32 कसोटी सामन्यांमध्ये 26 सामने जिंकले असून केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असून 5 सामने अनिर्णीत राहिले आहेत.

भारताचा मालिका विजय अशाप्रकारे

1)विरुद्ध ऑस्ट्रेलियाः 4-0 (4) मालिका विजय , फेब्रुवारी 2013
2) विरुद्ध वेस्टइंडीज: 2-0 (2) मालिका विजय,नोव्हेंबर 2013
3) विरुद्ध साउथ अफ्रीका: 3-0 (4) मालिका विजय, नोव्हेंबर 2015
4) विरुद्ध न्यूझीलंड : 3-0 (3) मालिका विजय, सप्टेंबर 2016
5)विरुद्ध इंग्लंड : 4-0 (5) मालिका विजय नोव्हेंबर 2016
6) विरुद्ध बांग्लादेश: 1-0 (1) मालिका विजय फेब्रुवारी 2017
7) विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 2-1 (4) मालिका विजय, फेब्रुवारी 2017
8)विरुद्ध श्रीलंका: 1-0 (3) मालिका विजय नोव्हेंबर 2017
9) विरुद्ध अफगानिस्तान: -0 (1) मालिका विजय जून 2018
10) विरुद्ध वेस्टइंडीज: 2-0 (2) मालिका विजय ऑक्टोबर 2018
11) विरुद्ध साउथ अफ्रीका: 3-0 (3) मालिका विजय ऑक्टोबर 2019

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like