काय सांगता ! होय, दशकातील सर्वोत्तम T – 20 संघात ‘हिटमॅन’ रोहित आणि MS धोनीला स्थान नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाने वर्षाचा शेवट दमदार मालिका विजयाने केला. २०१९ मधील सर्व कसोटी, वनडे आणि टी-२० सामने संपले आहेत. आता २०२० मध्ये म्हणजेच नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होईल. नवे वर्ष सुरु होण्याआधी क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विस्डेनने (Wisden) या दशकातील सर्वोत्तम टी-२० संघाची घोषणा केली आहे. याआधी विस्डेनने वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली होती आणि या दोन्ही संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपविण्यात आले होते. परंतु टी-२० संघाची घोषणा करताना विस्डेनने भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे.

विस्डेनने धक्कादायक निर्णय दिला आहे. कारण या दशकात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. तसेच महेंद्र सिंह धोनीला देखील यात स्थान मिळालेले नाही. सलामीवीर म्हणून कॉलिन मुनरो आणि अ‍ॅरॉन फिंच यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांचा स्ट्राइक रेट १५० पेक्षा जास्त आहे.

धोनीच्या ऐवजी बटलरला स्थान
या दशकात विकेटकिपर म्हणून धोनीला डावलण्यात आले असून धोनीच्या जागी जोस बटलरला स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त संघामध्ये ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद नबी, शेन वॉटसन या खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. जलद गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि लसित मलिंगा यांची निवड करण्यात आली असून राशिद खान आणि डेव्हिड विली यांना देखील संघात घेण्यात आले आहेत.

दशकातील सर्वोत्तम टी-२० संघ : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), कॉलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, जोस बटलर, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद नबी, राशिद खान, डेव्हिड विली, जसप्रीत बुमराह आणि लसित मलिंगा. यांचा समावेश संघात करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/