सोशल मीडियावर विराट ‘दबदबा’, सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला क्रिकेटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा बनवणारा विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर आहे. या व्यतिरिक्त कोहली सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. बाकी खेळाडूंच्या बाबतीत कोहली सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोवर्स असलेल्यांच्या यादीत सर्वात उच्च स्थानावर आहे.

ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या तीनही सोशल मीडियावर विराटाचे ३ करोडहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे कोहली सध्या सोशल मीडियावर प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनचे फेसबुकवर २.८ करोड, ट्विटरवर ३ करोड तर इंस्टाग्रामवर १.६५ फॉलोवर्स आहेत.

सध्या भारतीय टीम मध्ये जोरदार फॉर्मात असलेल्या रोहीत शर्माचे तीनही सोशल मीडियावर १ करोड पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सुरेश रैनाचे ट्विटर वर १.६७ करोड, इंस्टाग्रामवर ९० लाख, फेसबुकवर ३१ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

युवराज सिंहचे ट्विटर वर ४७ लाख, इंस्टाग्रामवर ७५ लाख आणि फेसबुक वर १.४ करोड फॉलोअर्स आहेत. तर हरभजन सिंहचे ट्विटर वर १.१ कारोड, इंस्टाग्रामवर ३६ लाख आणि फेसबुकवर ६६ लाख फॉलोअर्स आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचे ट्विटर वर ६७ लाख, इंस्टाग्राम वर ८५ लाख आणि फेसबुकवर ३६ लाख फॉलोअर्स आहेत.

भारताच्या शिखर धवनचे ट्विटरवर ४१ लाख, इंस्टाग्रामवर ४८ लाख आणि फेसबुक वर ८९ लाख फॉलोअर्स आहेत. वेस्टइंडीजच्या क्रिस गेलचे ट्विटरवर ४४ लाख, इंस्टाग्रामवर २८ लाख आणि फेसबुकवर ७८ लाख फॉलोअर्स आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like