Virat Kohli | डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर विराट कोहलीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Virat Kohli | दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी कॅप्टन आणि क्रिकेट जगतात ‘मिस्टर 360 डिग्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलियर्सनं (AB de Villiers) काही वेळापूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली आहे. डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2018 सालीच निवृत्त झाला होता. आता तो आयपीएल (IPL) आणि अन्य कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये खेळणार नाही. त्याच्या निवृत्तीनं त्याचा जिवलग मित्र आणि आरसीबीचा (RCB) माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच भावुक झाला. विराट आणि डिव्हिलियर्स 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा हिस्सा होते. या दोघांनी अनेक दमदार पार्टनरशिप करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

डिव्हिलियर्सचा जिवलग मित्र असलेल्या विराटनं (Virat Kohli) नुकतीच आरसीबीची कॅप्टनसी सोडली होती तर आता डिव्हिलिर्यसनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आरसीबीमधील एका युगाचा शेवट झाला आहे. विराटनं (Virat Kohli) एक ट्विट करत डिव्हिलियर्सच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्या काळातील बेस्ट खेळाडू आणि मला भेटलेला सर्वात प्रेरणादायी व्यक्ती. माझ्या भावा, तू आजवर जे काही केलंस, तसंच आरसीबीला जे दिलं आहेस त्याचा नेहमीच अभिमान बाळग. आपल्यातील नातं हे खेळाच्या पलिकडचं आहे आणि नेहमी असेल.’ तसेच तुझ्या या निर्णयाचा मला त्रास होत आहे. पण, तू नेहमीप्रमाणे तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्वोत्त निर्णय घेतला आहेस हे मला माहिती आहे. आय लव्ह यू ‘ असं ट्विट करत विराटनं एबीडीला त्यामध्ये टॅग केलं आहे.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या संपूर्ण T20 कारकिर्दीत 9424 धावा केल्या आहेत.
यामध्ये 4 शतके, 69 अर्धशतके यांचा समावेश आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 340 T20 सामने खेळले आहेत.
यामध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 37.24 होती. डीव्हिलियर्सने आपल्या टी-20 कारकिर्दीत 436 षटकार ठोकले आहेत तर 230 झेलसुद्धा घेतले आहेत.
तसेच आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सनं आरसीबीकडून 157 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 158.33 च्या स्ट्राईक रेटनं 4522 रन केले आहेत.
यामध्ये 37 अर्धशतक आणि 2 शतकांचा समावेश आहे. आरसीबीकडून सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटनंतर त्याचाच क्रमांक लागतो.

 

Web Title :- Virat Kohli | most inspirational person i have met virat kohli pays tribute to ab de villiers on retirement rcb

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | PM मोदींच्या घोषणेनंतर CM ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘सर्वसामान्यांची ताकद देशाला कळली’

Sharad Pawar | ‘…त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय’ – शरद पवार

Pune Corporation Elections | पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा, शनिवारी होणार प्रकाशन